अबब चक्क 300 अंडी देणारी कोंबडी, काय आहे नेमकं प्रकरण?

0

वारणानगर : कोल्हापूरच्या आखाड्या पासून चावडीपर्यंत आणि राजवाड्यापासून दसरा चौकापर्यंत सध्या सगळ्यांचं लक्ष एका कोंबडीनं वेधलंय. वारणानगर मधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात ही कोंबडी आहे.
          असं काय आहे या कोंबडीमध्ये पाहुया या रिपोर्टमध्ये…
राज्यात निवडणूकांच्या वर्षात राजकारणाची चर्चा थंडावली आणि एका कोंबडीच्या चर्चेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कोल्हापूरातील चावडीवर सध्या राजकारणाची किंवा झणझणीत तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चर्चा होत नसून एका कोंबडीची जोरदार चर्चा होतेय. या कोंबडीला पहायाला पंचक्रोशीतील सगळ्याच पोरासोरांनी, बाया-बाप्यांनी तोबा गर्दी केली. त्याला कारणही अगदी तसंच आहे.

कारण कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील वारणानगरमधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्याला मालामाल कऱणारी आणि वर्षाला ३०० अंडी देणारी कोंबडी सगळ्याचं लक्ष वेधून घेतेय. सरासरी एखादी निरोगी कोंबडी वर्षाला २०० अंडी देते. पण या कोंबडीनं कोल्हापूरसह सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. पाहुयात या कोंबडीला सोन्याचं अंड देणारी कोंबडी का म्हणतात ते.
        कोल्हापुरी कोंबडी वर्षाला 300 अंडी देते
बाजारात गावराण अंडीला 20 रुपयांचा दर
         वर्षाला 300 अंड्याच्या विक्रीतून 6 हजारांची कमाई
कोंबडीचं आयुर्मान 10 वर्ष, प्रजनन काळ 7 वर्ष
      

एका कोंबडीतून 42 हजारांचे उत्पन्न
कोल्हापूरमध्ये या कोंबडीची जोरदार चर्चा सुरू आहे.
एक कोंबडी जर शेतकऱ्याला इतकं घसघशीत उत्पन्न देत असेल तर अशा किमान ५ कोंबड्या शेतकऱ्याला सहज लखपती करतील असं म्हटलं तर कायबी चुकीचं नाय. या कोंबडीला पाहून जगात भारी, कोंबडी कोल्हापूरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here