अनिल वीर सातारा : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बांद्रा पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने दिमाखदार शानदार सोहळ्यात भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे लोकार्पण झाले.
यावेळी पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो,खा.वर्षाताई गायकवाड ,आ.झीशान सिद्दिकी, आ.अनिल परब,माजी आ. तृप्ती सावंत, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी तसेच रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सचिनभाई मोहिते, तांबे सुमित वजाळे, किसन रोकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण तांबे, पदाधिकारी आणि हजारो आंबेडकरी अनुयायी यांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन थाटामाटात शानदार पद्धतीने अत्यंत उत्साहात जल्लोषात विद्युत रोषणाईमध्ये करण्यात आले.