शारदा पतसंस्थेने पार केला २१ कोटी ठेवीचा टप्पा ; ग्रामीण भागातील संस्थेची उत्तरोत्तर प्रगती

0

संगमनेर : ग्रामीण भागात असूनही केवळ ठेवीदारांचा विश्वास प्राप्त केल्याने तालुक्यातील वाघापूर येथील शारदा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने थोडा थिडका नाही तर तब्बल २१ कोटी रुपये ठेवीचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्राचार्य रोहिदास केरूजी रहाणे यांनी दिली.

        जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रामदास पाटील वाघ, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, रायतेचे माजी सरपंच मच्छिंद्र शिंदे, संस्थेचे चेअरमन प्राचार्य रोहिदास रहाणे, व्हा. चेअरमन परशुराम काळे, माजी चेअरमन सुनील शिंदे, माजी व्हा.चेअरमन शेखर वाघ, माजी चेअरमन सुरेशराव खर्डे, सर्व आजी-माजी संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि विशेष म्हणजे कष्टाळू कर्मचारी वर्ग यामुळे संस्थेने तब्बल २१ कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार केल्याचे शारदा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य रोहिदास केरुजी रहाणे यांनी अभिमानाने सांगितले. परिसरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी ही पतसंस्था कर्ज पुरवठा करते, विविध योजनांच्या माध्यमातून या संस्थेने कर्जदार, ठेवीदार, सभासद यांचा मोठा आत्मविश्वास संपादन केला आहे. त्यामुळे संगमनेरच्या ग्रामीण भागात ओळखल्या जाणाऱ्या प्रगतीपथावरील मोजक्या पतसंस्थांमध्ये या संस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here