सातारा : भारतात चपाती जास्त प्रमाणात खाल्ली जाते. याचं कारण म्हणजे गव्हाचं पीठ इथे सहज उपलब्ध असतं. पण चपात्या आपल्या शरीरासाठी फार चांगल्या किंवा जास्त पोषणयुक्त नसतात. गव्हाच्या पीठात जे ग्लूटेन असतं त्याने शरीराला अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं.
आपण रोज जर चपात्या आहारात खात राहिलो तर त्याने शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हे सहसा लवकर आपल्याला जाणवत नाही.
डाएटीशियन निधी शुक्ला पांडे यांनी सोशन मीडियावर यासंबंधीत माहिती सांगितली आहे. त्यांच्या मते, गव्हात जास्त प्रमाणात ग्लुटेन असतं जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. हे आजार सध्याच्या पीठीला होऊ शकतात. पुर्वी चपात्यांचा वापर रोजच्या आहारात लोक करायचे. त्यांना कोणतंचं नुकसान व्हायचं नाही. मग आताचं हा त्रास का निर्माण झाला हे आपण पुढील माहितीतून समजून घेणार आहोत.
कणीक मळण्याची पद्धत
डाएटीशियनच्या मते, पुर्वी स्त्रिया कणीक मळताना त्यावर पाणी शिंपडून एका कपड्याने झाकून ठेवत असत. त्याने कणिकेमध्ये ग्लुटेनपासून तयार होणारा एक लवचिकपणा कणकेत यायचा. ज्याचा वापर शरीराला भरपुर प्रमाणात व्हायचा. त्यामुळे शरीराला चपाती पचायला सोपं जायचं. मात्र सध्याच्या स्त्रिया कणिक भिजवून लगेचच त्याच्या पोळ्या करतात.
त्याने कणीक सेट व्हायला वेळ मिळत नाही. त्याचा परिणाम शरीरावर होतो. तसेच कणिक फ्रीजमध्ये ठेवून त्याच्या चपात्या तयार करू नयेत. याने शरीराला नुकसान होण्याची शक्यता जास्त प्रमाणात शक्यता असते.
कणिकमळताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
१. जर गव्हाचं पीठ असेल तर ते रोजच्या सारखं नॉर्मल मळा.
२. ग्लूटेनने ग्रस्त असलेल्यांनी फक्त गव्हाचे पीठ खाऊ नये त्यात इतर धान्यांच्या पीठाचा देखील समावेश करावा.
३. कणीक मळल्यावर काही सात ते मुरवायला ठेवा.
४. पीठ झाकताना त्यावर पाणी किंवा तेल शिंपडा.
५. पीठ मळल्यानंतर १ तासाच्या आत पोळ्या बनवा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.