अकोला :- मामाच्या गावी पाहुणे म्हणून आलेल्या १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकणात पोलिसांनी २८ वर्षीय युवकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश वाघमारे व पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे.तर राज अरुण सदांशिव ( वय २८ ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात प्राप्त माहिती नुसार बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मामाच्या घरी आली होती . आरोपी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथे पळवून घेऊन गेला . पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी राज अरुण सदांशिव ( वय २८ ) यांच्याविरुद्ध अपहरणासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. ठाणेदार वाघमारे यांनी एक पथक नेमून आरोपीचा शोध घेण्यासाठी औरंगाबाद येथे रवाना केले होते. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेऊन शिताफीने त्याला अटक केली.ही कामगिरी ठाणेदार वाघमारे व पोलिसांनी केली आहे.
” मामाच्या गावी आलेल्या १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला औरंगाबाद येथे पळून नेत तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी २८ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल होता. औरंगाबाद येथे एक पथक पाठवून तपास केला असता आरोपी अटक करण्यात आला आहे.”
योगेश वाघमारे – ठाणेदार,चान्नी पोलीस ठाणे.