जेजुरीच्या माजी नगरसेवक महेबुब पानसरे खून प्रकरणी दोघांना अटक

0

जेजुरी – जेजुरी येथील माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे, रा. जेजुरी, पुणे यांचा निर्घुन खुन करणा-या मुख्य दोन आरोपीना अटक केल्याची माहिती पुणे पोलिसांनी येथे दिली. १) वनीस प्रल्हाद परदेशी, रा.४०४, गुरुवार पेठ, पुणे मुळगाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे २) महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी, वय ६५ वर्षे, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत .

पोलीस आयुक्त,रितेश कुमार यांनी पुणे व पुणे शहर परिसरातील खुन, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हयातील वांटेड आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करुन प्रतिबंध कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे शहर परिसरात गुन्हे शाखेतर्फे कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग, नाकाबंदी, सराईत गुन्हेगारांची चेकींग मोहिम कारवाई सुरु करण्यात आली होती.दिनांक ०७/०७/२०२३ रोजी धालेवाडी, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे यांचा जमीनीच्या वादातुन जेजुरी येथे निर्घुन खुन करण्यात आला होता. त्याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३०१ / २०२३ भादविक ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९,३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयांची गंभीरता व संवेदनशीलता ओळखुन पोलीस आयुक्तरितेश कुमार व सह पोलीस आयुक्तसंदिप कर्णिक यांनी सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकरीता पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे सो, गुन्हे पुणे शहर यांना सुचना
केल्या होत्या.दिनांक ०८/०७/२०२३ रोजी सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर सो, गुन्हे २, पुणे शहर यांना नमूद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे १) वनीस प्रल्हाद परदेशी, रा.४०४, गुरुवार पेठ, पुणे मुळगाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे २) महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी, वय ६५ वर्षे, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा ( अटक) हे दोघे जण डेक्कन परिसरात येणार आहे अशी गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस उप आयुक्तअमोल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा डेक्कन परिसरातुन शोध घेवुन त्यांना पकडून दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचा प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाले. या आरोपींनी त्यांचे इतर साथीदारासह वरील नमूद गुन्हा केला असल्याचे कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांना पुढील कारवाई कामी जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मा. सह पोलीस आयुक्त मा.अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे -२ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांनी केली .२ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांनी केली . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here