तरूणाकडून मुलीचा विनयभंग जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सोचा गुन्हा दाखल

0

आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी 

जामखेड तालुका प्रतिनिधी – 

सुट्टी मध्ये मामाच्या गावी आजीकडे जामखेड तालुक्यातील सारोळा येथे पिडीत मुलगी आली असता आजी शेतात गेलेली असताना  ती एकटीच घरी असल्याच्या संधीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केले तसेच तु माझ्या बरोबर लग्न केले नाही तर मी फाशी घेईल तेव्हा मी आरडाओरडा केला आजी समोरच्या दरवाजातून येत असताना आरोपी तरूण आजी दिसताच  मागील दरवाजातून पळून गेला. रात्री जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. प्रविण इंगळे, पोलीस कॉ.  देवा पळसे, पोलीस कॉ. नवनाथ शेकडे, पोलीस हे.कॉ. चालक आरसुळ यांनी आरोपी अविनाश सगळे याला घराच्या मधल्या खोलीत अंधरात पोटमाळ्यावर लपुन बसला असुन  पोलीसांनी त्याचा शोध घेत त्याला पकडुन अटक केले आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत पिडीत मुलीने म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मी मामाच्या गावी सारोळा येथे आजीकडे आलेली असताना दि. २३ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आजी शेतात गेलेली असताना मी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आजीच्या शेजारी असणारा अविनाश रामदास सगळे वय २२ रा. सारोळा हा जबरदस्तीने घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केले तसेच तु माझ्या बरोबर लग्न केले नाही तर मी फाशी घेईल तेव्हा मी आरडाओरडा केला आजी समोरच्या दरवाजातून येत असताना हे दिसताच आरोपी अविनाश  सगळे हा मागील दरवाजातून पळून गेला अशी फिर्याद पिडीत मुलीने जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे. 

आरोपी अविनाश सगळे विरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३५४ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन असल्यामुळे आरोपी विरोधात पोक्सोचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक केली असुन न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here