देवळाली प्रवरेत घरफोडी करणारे मुद्देमालासह जेरबंद

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                     देवळाली प्रवरा येथिल दशक्रियाविधी शेजारील बंद असलेल्या बंगल्याचे सहा कुलपे तोडून घरफोडी करणारे बेलापूर येथिल एक व देवळाली प्रवरा येथिल दोन जण 30 हजार 500 किमंतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले.देवळाली प्रवरा येथिल एक आरोपी फरार असुन पोलिस त्याचा शोध घेत आहे.

           याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की,देवळाली प्रवरा येथिल दशक्रियाविधी शेजारी राहणारे नाझिम सय्यद हे मुंबई येथे नोकरी निमित्त रहिवाशी असुन सुट्टीसाठी देवळाली प्रवरात आले असता बंगल्याचे सहा कुलपे तोडून घरफोडी झाल्याचे लक्षात आले.राहुरी पोलिस ठाण्यात नाझिम सय्यद यांनी अज्ञात चोरट्यां विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. घरफोडी करताना चोरट्यांनी दुचाकी वाहन, फॅन, फिलिप्स कंपनीचे स्पीकर,इतर साहित्य असे एकुण 35 हजार 500 रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

               

घरफोडीचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदार मार्फत घरफोडी करणाऱ्यांची नावे मिळाली.मिळालेल्या माहितीची खाञी करुन घेतल्यानंतर घरफोडी करणाऱ्या बेलापुर येथिल आयोध्या काँलनितील रहिवाशी शाहरुख सांडू सय्यद व देवळाली प्रवरा येथिल शाहरुख  रहिमतुल्ला शेख, इम्रान रज्जाक् शेख या तीघांनाजेरबंद करण्यात आले.तर देवळाली प्रवरा इस्लामपुरा येथिल जैद मुस्ताक सय्यद हा फरार असुन त्याचा पोलिस शोध घेत आहे.जेरबंद केलेल्या तीन आरोपींना राहुरी न्यायालयाने पोलीस कस्टडी रवानगी केल्या नंतर त्या तिघांनी चोरून नेलेली ऍक्टिवा दुचाकी व  फॅन असे एकूण  30हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला.

              सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबरमे,उपविभागीय पोलीस अधिकारी  बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात  पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, विकास वैराळ,पोलीस नाईक प्रवीण  बागुल,गणेश सानप,पो.काँ.प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे,नदीम शेख,अंकुश भोसले,सतीश कुऱ्हाडे आदींनी केला आहे.पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here