मृतदेह स्कूटरवरुन नेत नीरा नदीत फेकला
सारोळे : शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाणाऱ्या पुण्यात अलिकडे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पुणे सातारा महामार्गावरील सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या एका मृतदेहाचे गुढ अखेर उलगडले आहे. या मृतदेहाच्या उजव्या हातावर गोंदलेले ‘ओम ‘ आढळल्याने या खुनाचा छडा राजगड पोलिसांनी लावला आहे. अवघ्या बारा तासात हा खुन करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या पतीला पोलिसांना बेड्या घातल्या आहेत.
सारोळा येथील नीरा नदीत एक मृतदेह गोणीत बांधलेल्या स्थितीत सापडला होता. या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा ओळखण्या पलिकडे होता. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पठविणे जिकीरीचे झाले होते. अखेर या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम असा टॅटू आढळल्याने पोलिसांनी खबरी कामाला लावले. अखेर हातावर असे गोंदलेली एक व्यक्ती अनेक दिवस बेपत्ता असल्याचे नोंद एका पोलिस ठाण्यात सापडली आणि पोलिसांना अखेर क्लू मिळाला.
सारोळा येथील नदीपात्रात रविवारी ( दि. ९ ) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या हातावर ओम गोंदलेले असल्याने पोलिसांचा शोध सुरू झाला. चौकशीत ससाणेनगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचे समोर आले. या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर भिसे ( 35 ) असल्याचे उघडकीस आले. या मृतांची पत्नी योगिता भिसे ( 30 ) आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार ( 32 ) यांना अटक करण्यात आली आहे.
अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता…
राजगड पोलिसांनी सिद्धेश्वर याची पत्नी योगिता हिची चौकशीसुरू केली. तेव्हा सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली. योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांचे लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही शिवाजी तिला भेटण्यासाठी गावावरून येत होता. त्यांच्या या प्रेमसंबंधात सिद्धेश्वर अडचणीचा ठरला होता. त्यानंतर या दोघांनी मिळून कट रचत ३ मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून त्याचा खून केला.