सोनेवाडी नगदवाडीत प्लॉटिंग ग्राउंड बनला जुगारीचा अड्डा..

0

अवैद्य दारू विक्री व चोऱ्या माऱ्या वाढल्या.. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने कारवाई करावीची मागणी 

कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी नगदवाडी परिसरात सध्या अवैद्य दारू विक्री व चोऱ्या माऱ्या यांचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिक व शेतकरी यामुळे हैराण झले आहे. नगदवाडी परिसरात पालखी रोड लगत असलेला बंटी चोरडीया यांचा प्लॉटिंग क्षेत्रात तर म्हसोबा मंदिराजवळ जुगारीचा अड्डा बनला आहे. या जुगारींचा व अवैद्य धंद्यांचा बंदोबस्त कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सोनेवाडी परिसरात रोज दारू पिऊन रात्री अनेकांचे भांडणे तंटे होऊ लागले आहे. रोजच्या मारामाऱ्या व आरडा ओरडाणे यामुळे नागरिक धास्तावले आहे. अवैद्य दारू विक्रीमुळे अनेक तरुण वाम मार्गाला लागले आहेत. शेतकऱ्यांच्या डीपी सह अनेक विद्युत मोटारी चोरट्यांनी चरून नेलेल्या आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागच्या वर्षी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन ने जुगारीच्या ठिकाणी रेड मारली होती. तेव्हा काही प्रमाणात या जुगारीचा बंदोबस्त झाला होता.या

जुगारीच्या ठिकाणी तर चांगल्या घरातील नागरिक देखील दिवस दिवस बसून तिरट व रमी खेळत आहे. पैशावर चालणारा डाव जवळपास 50 हजार रुपयांच्या घरात जात असल्याचे स्थानिक नागरीकां कडन बोलले जाते. या प्लॉटिंगला चारी बाजूने वॉल कंपाऊंड केले आहे. ठिकठिकाणी मधोमध भिंती असल्यामुळे जुगार खेळणाऱ्या मंडळींना कोणी आले असता पळून जायचा मार्ग सापडतो. या जुगारी मंडळींचा बंदोबस्त करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन ने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here