देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी आलेल्या १२ वर्षे वयाचा अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्या शरीराला स्पर्श करुन, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून,विनयभंग केला व मांडीवर बसवले. हि घटना १५ जानेवारी रोजी रात्री ८ -३० चे सुमारास राहुरी शहरातील इस्माईल नगर,खाटीक गल्ली येथे घडली आहे.या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
या बाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की,लिंगपिसाट आरोपी दगडू बाबुभाई शेख याने आणखी ०१ अल्पवयीन मुलींचा अशाच प्रकारे विनयभंग केला असून त्यातील एक ८ वर्षाची दुसरी १० वर्षाची व तिसरी ११ वर्षाची आहे. १२ वर्षाच्या मुलीच्या वडीलांनी पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी नराधम दगडूभाई शेख,राहणार खाटीक गल्ली याच्याविरुद्ध विनयभंग व बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को)कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक कलुबर्मे व पोलिस उपअधिक्षक डाँ.बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शेखला पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांनी रात्रीच अटक केली आहे.या घटनेने पालकवर्गात घबराट पसरली असून लिंगपीसाट शेखला दया माया दाखवू नये,त्याला कठोर शासन करावे अशी मागणी नातेवाईक व संतप्त नागरीकांनी केली आहे .