पैठण,दिं.८.(प्रतिनिधी :मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी हि संस्था पैठण परिसरातील जायकवाडी उत्तर या शासकीय वसाहतीत सन 1995 सालापासुन कार्यरत असून तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या संस्थेचा लोकार्पण सोहळा पार पडला . मुख्यमंत्री,राज्यपाल अदि मान्यवरांच्या हस्ते एखाद्या संस्थेचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर त्याठाणाहून ती संस्था हलविण्यात येत नसते.असे सर्वसाधारण धोरण असतांना ही पैठण येथील विकास प्रशिक्षण प्रबोधनी संस्था हलविण्याचा घाट घातला जात आहे. या बातमीमुळे विविध राजकीय पक्षाच्या व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकत्यात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांत व जनतेत संताप असंतोष नाराजीचा सुर उमटतांना पहावयास मिळत आहे.
मराठवाडा विकासाच्या 42कलमांर्तगत,पुर्ण अभ्यासाअंती देशातील पर्यटक स्थळ म्हणून परिचित असलेल्या पैठण परिसरातील औरंगाबाद, अहमदनगर,जालना, बीड, या राज्य मार्गावरील जायकवाडी उत्तर येथील सर्व सुविधा युक्त तथा निसर्ग रम्य जागेत हि संस्था सुरू करण्यात आली आहे.गेल्या वर्षांपासून कार्यरत असलेल्या या विकास प्रशिक्षण प्रबोधनी संस्थेतून काम करीत असलेल्या सर्व श्रेणीतील शासकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेलेले आहे. व दिले जात आहे. राज्यभरातील विविध विभागात काम करणाऱ्या हजारो अधिकारी व कर्मचारी येथे येऊन त्याच्याशी संबंधित असलेल्या विषय तथा खात्याचे प्रशिक्षण घेऊन या संस्थेतून जातात या संस्थेतून नियमित बाराही महिने प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले जातात.
प्रशिक्षणासाठी निसर्ग रम्य परिसरात इमारत आहे तसेच वेळोवेळी इमारतीचा विस्तारीकरण ही झालेला आहे व करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाकडून पुरेसा निधीही उपलब्ध ही करून देण्यात येतो कोणत्याही परिस्थितीमध्ये तिर्थक्षेत्र तथा पर्यटन स्थळ असलेल्या पैठण परिसरातील सर्व सुविधा युक्त उत्तर जायकवाडी येथील हे प्रशिक्षण प्रबोधनी केंद्र कोणत्याही परिस्थितीत हलविण्यात येऊ नये अशी मागणी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. माजी मंत्री दिवाकर रावते व पालकमंत्री संदिपान भुमरे व कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे पैठण येथे मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी हि संस्था अभ्यास करून व योग्य ठिकाणी असल्यामुळेच पैठण येथे सुरू करण्यात आली आहे. तसेच या संस्थेसाठी आवश्यकता वाटल्यास विस ते पंचवीस एकर जमीन जायकवाडी उत्तर येथे पडून आहे तीही उपयोगात येऊ शकते.संस्था हलविण्याचा घाट काही अधिकार्यांनी हा घालु नये नसता नाइलाजास्तव तीव्र आंदोलन जनतेला छेडावे लागेल या संदर्भात कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ पालकमंत्री संदिपान भुमरे यांना भेटणार आहे.