पैठणला ग्रामीण घरकुल आवास योजना लाभार्थींचा मेळावा संपन्न

0

पैठण,दिं.११.(प्रतिनिधी) : पैठणला ग्रामीण घरकुल आवास योजना लाभार्थींचा मेळावा शुक्रवार दिं.११ रोजी दुपारी बारा वाजता संत एकनाथ महाराज परीसरातील हाॅल मध्ये शुक्रवार दिं.११ रोजी सकाळी बारा वाजता संपन्न झाला यावेळी तालुक्यातील महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासन पुरस्कृत पैठण तालुक्यातील मंजूर ग्रामीण घरकुल आवास योजनेंतर्गत मंजूर लाभार्थींचा मेळावा नाथ मंदिर परीसरातील सभागृह पैठण येथे छत्रपती संभाजीनगरचे खासदार  संदिपान पाटील भुमरे यांच्या सूचनेवरून पंचायत समिती पैठण च्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण घरकुल आवास योजना अंतर्गत मंजूर लाभार्थींचा मेळावा पैठणला आयोजित करण्यात आला होता.

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवाज योजना, मोदी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षात मंजूर लाभार्थींना एकत्रितपणे घरकुल मंजुरी बाबत प्रमाणपत्र  प्रातिनिधिक स्वरूपात या मेळाव्यात देण्यात आले, तसेच घरकुल लाभार्थींचे घरकुल जलद गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती कागदपत्रे पंचायत समितीला जमा करणे व तातडीने मंजूर घरकुल पूर्ण करणे या बाबत आवश्यक त्या सूचना सरपंच व  ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत मंजूर हिमरू शाल वर आधारित खास महिलांकरिता  तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम ( टी इ डी पी) निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमा (आर इ टी पी) चे प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींना रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे पाटील व प्रकल्प संचालक विनोद तुपे  यांच्या हस्ते लाभार्थींना वितरित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू  भुमरे , गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, महाराष्ट्र राज्य दूध संघाचे संचालक नंदू अण्णा काळे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णाभाऊ लबडे, अशोक बर्डे, अशोक धर्मे,माजी उपनगराध्यक्ष शहादेव पाटील लोहारे, शिवराज पारीख, जनार्दन मिटकर, विष्णू खंडागळे, राजेश मानधने सह आदींची  उपस्थिती होती. 

   

या कार्यक्रमासाठी पैठण तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक पंचायत समिती सुनील इंगळे, विस्तार अधिकारी दशरथ खराद, राधाकिसन चौधरी,  सुनील इंगळे, बळीराम राठोड, ग्रामविकास अधिकारी सागर डोईफोडे, सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी  जिजाभाऊ मिसाळ सह आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते,

      सदर कार्यक्रमासाठी रवींद्र तात्या सिसोदे, पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे, शाहादेव लोहारे , शिवराज पारीख ,जनार्दन मिटकर, विजय सुते, भूषण कावसनकर, किशोर चौधरी, मनोज गायके , भाऊसाहेब तरमले  नामदेव खराद, ज्ञानेश्वर गायके, मनीष औटे, राज मानधने आदींची उपस्थिती होती . सदर कार्यक्रम  यशस्वीतेसाठी घरकुल विभागातील अविनाश चपडे, घरकुल अभियंता अजय राऊत, शेळके, कुंदन भालेराव राज भालेराव, दिनेश सवणे, आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी दशरथ खराद यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी  केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here