प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाचा धनादेश प्रदान 

0

पैठण ,दिलं.२८.(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथील रहिवाशी विजय तेवर यांची आई लक्ष्मी तेवर यांना इसारवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखाधिकारी अनुपम कुमार यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपये रकमेचा धनादेश प्रदान केला. इसारवाडी  येथील रहिवाशी विजय तेवर यांचा आकस्मित मृत्यू झाला होता. त्यांनी ईसारवाडी येथील स्टेट बँकेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अपघात विमा काढला होता. ४३६  रुपयांचा वार्षिक हप्ता ते या बँकेत भरत होते.

विजय तेवर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेचे शाखा अधिकारी अनुपम कुमार व नातेवाईक कृष्णमूर्ती नल्लायन यांनी तात्काळ कागदपत्रे देऊन कार्यवाही करून तेवर कुटुंबाला बँकेत बोलून दोन लाख रुपये रकमेची धनादेश दिला. यावेळी  शाखेचे सेवा प्रबंधक राहुल धवन क्षेत्र अधिकारी किशोर कापडे व शाखेचा कर्मचारी वर्ग तसेच सरपंच भरत मुकुटमल, हरिभाऊ दिलवाले, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पैठण तालुकाध्यक्ष तथा पत्रकार गजानन आवारे पाटील,तेजस ठोंबरे, सोमनाथ नवगिरे.विजय गायकवाड आणि शाखेचे ग्राहक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here