पैठण,दिं.१८.(प्रतिनिधी): बालानगर येथे सालाबादप्रमाणे या ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेला ह.भ.प.श्रीकांत महाराज दिलवाले यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला असून रोज अकरा यजमानांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथाची पुजा करण्यात येते. रविवार दिं.१७ रोजी माजी सरपंच अमोल पाटील गोर्डे,सौ रूपाली गोर्डे,चिं अरूष गोर्डे,विजय नलावडे,सौ नलावडे, सचिन दिलवाले,सौ दिलवाले, अच्युत गोर्डे,सौ गोर्डे, दादासाहेब नलावडे,सौ नलावडे,रवि गोर्डे,सौ गोर्डे,सोनु रूळे,सौ रूळे यांच्या सह भाविकांनी आरती केली दुपारी रोज सामुदायिक महापंगत सुरू असून परीसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
बालानगर येथे सालाबादप्रमाणे या ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेला ह.भ.प.विश्वनाथ महाराज रिठे यांच्या सुमधूर वाणीतुन प्रारंभ झाला.यावेळी दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा भजन, विष्णुसहस्रनाम,गाथा भजन,दोन सत्रामध्ये भागवत कथा,सायंकाळी हरिपाठ व रोज रात्री 8 ते 10 ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर,ह.भ.प.प्रकाश महाराज मुळे,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम,ह.भ.प.विशाल महाराज खोले,ह.भ.प बंडातात्या कराडकर,ह.भ.प.कृष्णाजी महाराज नवले,ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक यांचे हरिकिर्तन होणार असून ह.भ.प.विश्वनाथ महाराज रिठे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
यावेळी बालानगरसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी भागवत कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत सप्ताह कमेटी यांनी केले आहे.