पैठण,दिं.१:ग्रामपंचायत लोहगाव ता.पैठण येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मालकीच्या गाळेधारकांनी ३१ मार्च २०२३ पूर्वीचे थकबाकी न भरल्यामुळे ग्रामपंचायत लोहगाव येथील ग्रामविकास अधिकारी नारायण पाडळे सह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहा गाळे सिल करण्यात आले.
पैठण लोहगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १७ गाळे बांधुन ते सुशिक्षीत बेरोजगारांना भाडेतत्त्वावर देण्यात आलेले असून ३१ मार्च २०२३ पूर्वीची गाळे धारकाकडील थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने बाकी गाळेधारकांनी थकीत बाकी भरली मात्र सहा गाळेधारकांनी न भरल्यामुळे शनिवार रोजी गाळे धारक दिलीप देशमाने, अशोक देशमाने, विठ्ठल वाघ,शरद मांडे, सुभाष मांडे, बाबासाहेब घुले या सहा गाळेधारकांकडे थकबाकी असल्याने त्यांचे दुकान (गाळा) सिल करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नारायण पाडळे यांनी दिली यावेळी ईस्माईल शेख, गणेश चव्हाण,हनिफ शेख,फैसल पठाण, कृष्णा मतकर सह यांनी केली.