श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देणार…

0

पैठण,दिं.२१.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढीवारी सोहळ्यात मानाचेस्थान असलेल्या श्री क्षेत्र पैठण येथील श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असून यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पैठण येथे शुक्रवार दि.२१ रोजी तहसील कार्यालयात आयोजित पालखी प्रस्थान सोहळा नियोजन बैठकीत दिल्या आहे.

   या नियोजन बैठक प्रसंगी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण यांची उपस्थिती होती. आषाढी वारी सोहळ्यासाठी श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळा दि.२८ रोजी सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून या सोहळ्या दरम्यान निर्माण होणाऱ्या अडीअडचणी संदर्भात पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, ह.भ.प योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासमोर  अडचणी मांडल्या. यावेळी पहिल्या मुक्कामासाठी पैठण ते चनकवाडी या गावाला जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पारंपारिक मार्ग तयार करून देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना वारकऱ्यांची सेवा ईश्वर सेवा समजून कार्य करण्याच्या सूचना घेऊन पालखी सोहळ्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे बैठकीत सांगण्यात आले आहे. याप्रसंगी नगरपरिषद मुख्य अधिकारी संतोष आगळे, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता विजय काकडे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, प्रशासन अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी दशरथ खराद, आरोग्य अधिकारी सय्यद अजहर ,टी डी दिवेकर, डॉ. सचिन अवसरमल,कामशेट्टी, डॉ. राम कुन्हाडकर, नाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे गजानन झोल, महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक घुले, शहर अभियंता रोहित तायडे, पालखी सोहळ्याचे चंद्रकांत अंबिलवादे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आरती सव्वाशे, विशाल सानप, सरपंच गोकुळ रावस, तलाठी दिलीप बाविस्कर, वरिष्ठ पेशकार बालाजी कांबळे, भडके, दिनेश पारिक, विलास मोरे, रामेश्वर बावणे, भगवान कबड्डी, एकनाथ बावणे, फकीरचंद घेवारे, कृष्णा बावणे, सुभाष ससाणे, बबन भोसले, गौतम गायकवाड, अमोल दुकळे, भागचंद ससाणे, गोपनीय शाखेचे मनोज वैद्य, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here