छ. संभाजी नगर : बाबासाहेबांच्या विचाराप्रमाने आपण संघटित होउन संघर्षासाठी सज्ज झालो तर आपण कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत आणि व साहित्यिक आणि आंबेडकरी विचाराचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी केले ते आरक्षण बचाव परिषदेत मध्ये बोलत होती या परिषदेचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश दलितांचे अध्यक्ष अध्यक्ष रमेश भाई खंडागळे होते तर प्रमुख वक्ते प्राचार्य प्रमोद हिरोडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी आदमाने, प्राध्यापक भगवान धांडे संजय भाऊ कांबळे प्रा . मोहन सौंदर्य, प्रा . समाधान धांडे , ओमपाल चावरिया यांची उपस्थिती होती.
पुढील लढयाची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचा संघर्षाचा विचार घेऊनच पुढे जावं लागणार आहे अशीही प्रतिपादन त्यांनी केले. प्राचार्य हिरवडे यांनी आरक्षणाची सविस्तर मांडणी करून हा धोका मागासवर्गीयांच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा निर्माण करू शकतो आणि म्हणून यासाठी सर्वांनी एकत्रित होऊन होणार उभारला पाहिजे . सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मान्यता दिलीच पाहिजे असं बंधन शासनावर किंवा सरकारवर नाही परंतु हे सरकार ते करणार नाही म्हणून सरकारवर दबाव टाकण्यासाठी सुद्धा तुम्हाला लढा उभारावा लागणार आहे. हा निर्णय खऱ्या अर्थाने पंजाब आणि हरियाणाच्या संदर्भातला होता, बाकीच्या राज्याने तो अमलात आणावा की नाही हे त्यांच्या नैतिक नीतीमत्तेवर अवलंबून आहे. क्रिमिलियर्सची कोणताही मागणी नसताना त्या ठिकाणीच्या न्यायमूर्तीने यावर कारण नसताना निर्णय दिलेला आहे आणि हा अत्यंत धोकादायक आहे कारण एकच पिढी फक्त त्यापासून प्रभावी होऊ शकते आणि बाकीच्या पुढच्या पिढ्या पुन्हा मागं येऊ शकतात म्हणून यासाठी संघर्ष करने आवश्यक आहे असल्याची हिरोडे यांनी सांगितले.
प्राध्यापक भगवान धांडे समाधान धांडे यांनी आणि प्रमूख पाहुणे म्हणून संजय भाऊ कांबळे यांनीही मोलाचं मार्गदर्शन करून जमलेल्या कार्यकर्त्यांना संघर्षासाठी सर्व शक्तींची उभं राहावं असे आवाहन केलं.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार स सो खंडाळकर यांनी संपूर्ण आरक्षण वाद्यांनी एकत्र येऊन हा संघर्ष यशस्वी करण्याचे आव्हान केले . अध्यक्ष सामारोपत रमेशभाई खंडागळे यांनी एक ठरावच मांडला आणि त्याला संपूर्ण कार्यकर्त्यांनी जोरात टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. तो ठराव असा सुप्रीम कोर्टाने पुनर्विलोकन करून या निर्णयाचा फेर विचार करावा. किंवा केंद्र सरकारने पार्लमेंट मध्ये हा निर्णयात बदल करावा. नसता आम्हाला रस्त्या उतरून आंदोलन करावे लागेल असा ठराव मांडला त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला.
यावेळी नितेश तांगडे कडूबा मस्के संतोष खिल्लारे अजय बोर्डे अनिल हातागळे देविदास वाघमारे उमेश गायकवाड गणेश शिवराळे दादाराव आढाव सोमीनाथ कसारे सतीश मोकळे महिला आघाडीच्या सुभद्राताई नवगिरे उषा खंडाळे , रेखा भुईगळ, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड दिशा खंडाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश चव्हाण यांनी केले.