१ हजार हून अधिक जखमी झाल्याची भीती
काबुल :earthquake in Afghanistan अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शनिवारी (7 ऑक्टोबर) ला आलेल्या तीव्र भूकंपात ५०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहे तर हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती अफगाणी प्रशासनाने दिली आहे. या विनाशकारी भूकंपानंतर बचावकार्य वेगाने सुरू आहे.
भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था रेड क्रिसेंटने दिलेल्या माहितीनुसार भूकंपात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या एका प्रवक्त्याने एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढू शकतो. आपत्ती निवारण विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार एक हजार लोक जखमी आहे. अनेक गावं पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. पण मृतांची संख्या किती आहे याविषयी अजूनही ठोस माहिती नाहीये. हेरात येथील रुग्णालयाच्या संचालकांनी बीबीसीला 255 लोक दगावल्याची माहिती दिली आणि 500 लोक जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2023/10/a85f05c0-659b-11ee-b34c-6dbde9fedf9a.jpg)
हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंप झाल्यानंतर बराच वेळ धक्के जाणवत होते. भूकंपामुळे इराणच्या सीमेलगत असलेल्या हेरात शहरातील इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात आलेल्या भूकंपात एक हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.या भूकंपात बचावलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आधी तिथल्या इमारती जोरजोरात हलल्या आणि त्यांच्यावर कोसळल्या.