येवला प्रतिनिधी :
आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान येवला तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व महीला येवला विंचुर चौफुलीवर मोठा संख्येने जमा झाले होते. पक्षाचे नेते महेंद्रभाऊ पगारे यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व जोरदार घोषणा करत महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरवात झाली. हातात मागण्यांचे फलक धरून पक्षाचे झेंडे घेऊन सदर मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने वाटचाल करू लागला. यावेळी पोलिसांनी मोठा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
ढोली बाजाचा गजर करत जोरदार घोषणा देत संपुर्ण परिसर दणाणून सोडला होता मोर्चा तहसील कार्यालया समोर गेल्यावर सभेत रूपांतर झाले बाळासाहेब आहिरे सौ. आशा आहेर यांची भाषणे झाली.
यावेळी महेंद्रभाऊ पगारे यांनी सरकारवर जोरदार टिका करताना म्हणाले की उन्हाळ्यात पाऊस बे मोसमी झाल्यामुळे उन्हाळ कांदा मोठा प्रमाणा सडला. शिल्लक मालालापण अजिबात भाव नाही. सरकारने जाहीर केलेले अनुदान अध्याप मिळालं नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. बॅंका शासनाचा आदेश असुनही पिक कर्ज देत नाही. घरकुल योजनेचा तुटपुंजा निधी कडे शासनाचे लक्ष नाही. की कडे आनंदाचा शिदा दिला जातो पण दुसरीकडे गरजूंना मात्र रेशन कार्ड वर कुठलच धान्यं मिळतं नाही. विधवा घडस्पोटीत व अपंगाना जाचक अटी मुळे मासिक वेतन मिळतं नाही. या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले व विरोधक देखील बोलायला तयार नाही. आज हजारो जनता वैतागून गेली तरी देखील कोन्ही लक्ष देयाला तयार नाही. म्हणून माझ्या वर विश्वास ठेवून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मोर्चात सर्व सामान्य जनता जन आक्रोश मोर्चा त सहभागी झाली आहे. जर मोर्चाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे नाशिक कलेक्टर कचेरी वर छेडले जाईल असा इशारा महेंद्रभाऊ पगारे यांनी बोलताना व्यक्त केला.
सदर निवेदन तहसीलदार आबा महाजन व पोलिस निरीक्षक कदम , एपीआय नितीन खडागंळे यांनी स्विकारले.
*मोर्चातील खालीलप्रमाणे मागण्या घेण्यात आल्या आहे*
*1)कांदाला जाहीर केलेले 350 रू अनुदान तात्काळ द्या*
*2)भोगवाटवर्ग 2 च्या जमीनीवर पिक कर्ज उपलब्ध करून घ्या*
*3)घरकुल 1 लाख 38 हजार रू वरून 3 लाख रुपये करण्यात यावे*
*4)4/5वर्षा पासुन दिलेले नविन रेशन कार्ड वर धान्य तात्काळ द्या*
*5)निराधार अपंग विधवा घडस्पोटीत महीला यांच्या प्रकरणातील जाचक अटी रद्द करा*
यावेळीें महेंद्रभाऊ पगारे (तालुकाध्यक्ष स्वारीप तथा चेअरमन)विजयभाऊ घोडेराव(ता.कार्यध्यक्ष) अजहरभाई शेख (शहराध्यक्ष ) सुरेश खळे, बाळासाहेब आहीरे, विनोद त्रिभुवन, मयुर सोनवणे,विजय पगारे, समाधान पगारे,बाळासाहेब सोनवणे, ईलियाज पठाण, गुड्डू शेख, दादासाहेब मोरे, वसंत घोडेराव, भाऊसाहेब केदारे, गौतम पगारे, महेंद्र खळे, गणेश झाल्टे, संजय निकम, कृष्णा मोरे, नवनाथ पगारे, लक्ष्मण सोनवणे, ॠशिकेश पगारे, दत्तु वाघ, भागिनाथ पगारे, अतुल धिवर, रोहित पगारे, मच्छिद्र गायकवाड, अशोक आहेर, चागंदेव गाढे, शिवाजी मोरे, मनोहर पवार, सतोष आहीरे, युवराज पगारे, सौ.आशा आहेर, सौ. उषा पगारे, शांताबाई झाल्टे, सौ. ज्योतीताई पगारे, सविता आहीरे, नंदिनी पगारे, वत्सलाबाई झाल्टे, सौ. पार्बताबाई पगारे, सौ संगीता रणधीर, यांच्यासह अनेक महिला व कार्यकर्ते मोठा सख्येन उपस्थित होते.