सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर अनेकांनी काम केलेले आहे. त्यामुळेच सर्वत्र कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झालेले आहे. अंनिसचे कार्य करण्याची प्रेरणा दस्तुरखुर्द कॉ.खुर्द यांच्याकडून मिळाली.असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत पोतदार यांनी केले.
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी कॉ.के.डी. खुर्द (तात्या) यांचे नुकतेच निधन झाले होते.तेव्हा त्यांना सातारा वासियांकडून आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला.तेव्हा प्रशांत पोतदार मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जयंत उथळे होते.
प्रशांत पोतदार म्हणाले, “अंनिसच्या माध्यमातून अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कॉ.के.डी. खुर्द यांनी लोकचळवळ उभी केली.”
चंद्रकांत भस्मे म्हणाले,”खुर्द तात्यांनी कुटुंब व समाजकार्य वेगवेगळे ठेवले होते.ते कुटुंब वत्सल होते.कोणत्याही गोष्टींचे नियोजन ते अचूक करीत असे. रूढी-परंपरा यास मूठमाती देण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले.अंनिसच्या माध्यमातून तात्यांनी होळीची पोळी दान व जटानिर्मूलन,गोसाव्यांच्या पाल्यासाठी शाळा, मोलकरिणीसाठी सायकल वाटप आदी कार्य केले.” यावेळी सौ.भस्मे यांच्यासह अनेकांनी खुर्द तात्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.
खुर्द तात्यांनी आयुष्यभर राजकारणवीरहित कम्युनिष्ठ विचारांचेच काम केले.असे प्रास्ताविकपर माहिती प्रकाश खटावकर यांनी विविध उदाहरणाद्वारे सांगितली.खुर्द तात्यांच्या जीवनचरित्रावर उजाळा देण्यासाठी सोशल मीडियावर नियमित पोस्ट टाकणार असल्याचे विजय पवार यांनी स्पष्ट करून आभारप्रदर्शन केले.
प्रारंभी कॉ.के.डी. खुर्द (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.सदरच्या कार्यक्रमास जयंत उथळे,विजया कारंजकार, गुलाब भस्मे, बाळासाहेब शिरसाट,सलीम आतार,अनिल वीर, नामदेव मदने,जयप्रकाश जाधव, शिरीष जंगम,ऍड.हौसेराव धुमाळ, विनायक आफळे, परवेज सय्यद आदी तत्सम संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.