सातारा-अनिल वीर : जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ऍड.हौसेराव धुमाळ, वंदना माने,शंकरराव कणसे, मोहसीन शेख,भगवान रणदिवे व विलासराव भांदिर्गे यांना आधारस्तंभ कार्यकर्ता पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
सदरचे पुरस्कार साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते मालवण येथे म.अंनिसतर्फे वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ऍड.मुक्ताताई दाभोळकर, देवदत्त परुळेकर,दिलीप गिरमे, प्रशांत पोतदार,प्रभावती नानावटी, अरविंद पाखले,गणेश चिंचोळे,अनिल चव्हाण,राहुल चव्हाण या मान्यवरासह राज्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.याबद्धल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.