सातारा/अनिल वीर : म्हसवड येथील अर्धवट केलेले एस.टी.बस स्थानकाचे काम होते.तेव्हा अनेक गोष्टींचा प्रवाशाना त्रास व्हायचा. मात्र,बांधकाम सुरू केल्याने अखेर ११ व्या दिवशी थांबले आहे.
रिपब्लिकन सेनेचे मान तालुकाध्यक्ष अजिनाथ केवटे यांनी ११ दिवस केलेल्या उपोषणामुळे तसेच शहरातील सर्व संघटना,सर्व पक्षातील पदाधिकारी व सर्व सामान्य लोकांनी १० व्या दिवशी रस्ता रोको केल्यामुळे महाराष्ट्र परिवहन मंडळ यांनी ताबडतोब दखल घेऊन बसस्थानकाचे काम चालू केलेले आहे. बस स्थानकाचे अर्धवट प्रलंबित बांधकाम तत्काळ सुरू केल्यानंतरच केवटे यांनी उपोषण मागे घेतले आहे. नवीन ठेकेदार मे.एस.स्वेअर इनफरा पुणे कॉन्ट्रॅक्टर यांनी बांधकामास लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले असून दस्तुरखुद्द अजिनाथ केवटे यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.फटाके वाजवून प्रवासी व सर्वसामान्य जनतेनी आनंद व्यक्त केला आहे.