अनिल वीर सातारा : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.ऍड.भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने बुधवार दि.१२ रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्याची आणि गया येथील महाबोधी मंदिराचे नियंत्रण बौद्धांना हस्तांतरित करण्याची मागणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (पूर्व व पश्चिम विभाग),सातारा – जिल्हा,भारतीय बौद्ध महासभा (पूर्व व पश्चिम विभाग) सातारा – जिल्हा व समता सैनिक दल सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगच्या जिल्हा , तालुका , शहर पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य तसेच बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन करण्यात येत आहे.असे आवाहन भीमराव घोरपडे (जिल्हाध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व), गणेश भिसे (महासचिव , वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पश्चिम),अरविंद आढाव व तुषार बैले (महासचिव , वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व) व शरद गाडे (महासचिव, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पश्चिम) यांनी केले आहे.