आज वंचितच्या सभेत, चला सत्ताधारी जमात बनुयाचा नारा….

0

सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील आंबेडकरवादी,मानवतावादी,समतावादी,सामाजिक,राजकीय पक्ष,आदी संघटना यांची महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन रविवार दि.२१ रोजी दुपारी ३ वा.येथील शासकीय विश्रामगृहांमध्ये आयोजीत करण्यात आली असून चला सत्ताधारी जमात बनूया.असा नारा देत याच प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.अशी माहिती वंचितने दिली आहे.

           जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आंबेडकरवादी, मानवतावादी, समतावादी पक्ष आदी संघटना यांनी एकमताने जातीयवादी व धर्मांदशक्ती यांना सत्तेपासून दूर राखण्यासाठी तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी विचारमंथन व्हावे. यासाठीच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे.तरी ज्या काही पक्ष संघटना आहेत.त्यांनी  सहविचार विचारमंथन सभेमध्ये आपले विचार मांडून सहभाग नोंदवायचा आहे.तेव्हा त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन निमंत्रक म्हणून महासचिव गणेश भिसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here