सातारा/अनिल वीर : जिल्ह्याचे सुपुत्र समाजिक कार्यकर्ते बाळासाहेब यांचे नुकतेच निधन झाले होते.तेव्हा जिल्ह्यातील सर्व घटकांनी अंत्यविधिस उपस्थीत राहून आदरांजली अर्पण केली होती.याशिवाय,भीमशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा काँग्रेसचे राज्यसभेचे खा.चंद्रकांत हंडोरे यांनीही अंत्यदर्शन घेतले होते. बुधवार दि.५ रोजी इंदोली येथे तर गुरुवार दि.६ रोजी सातारा येथे आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बाळासाहेब शिरसाठ यांच्या मूळगावी इंदोली,ता.कराड येथे पुण्यानुमोदनपर आदरांजली कार्यक्रम बुधवार दि.५ रोजी सकाळी ९।। वा.होणार आहे. याशिवाय,सातारा शहरातील तमाम सामाजिक, राजकीय आणि परिवर्तनवादी संघटना व्यक्ती व संस्था सदस्यांनी आदरांजली सभेसाठी गुरुवार दि.६ रोजी रात्रौ ८।। वा. सेंट्रल प्लाझा बिल्डिंग नगर वाचनालय शेजारी राजवाडा येथे उपस्थित रहावे. असे आवाहन भगवान अवघडे (सदस्य,राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन) यांनी केले आहे.