विजय ढालपे,गोंदवले – मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आटपाडी तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित करण्यात आला . आटपाडी तालुक्यातील 250 शाळांना सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये तंबाखूमुक्त जीवन जगता यावा यासाठी शिक्षण विभाग आरोग्य विभाग व सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत सांगली जिल्ह्यामध्ये काम करण्यात येत असल्याचे माहिती सलाम मुंबई फाउंडेशन चे जनरल मॅनेजर सौ कल्पना पिल्लई मॅडम यांनी दिली.
सदर कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ सलाम मुंबई फाऊंडेशनचे जनरल मॅनेजर कल्पना पिल्लई प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड योजना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे तंबाखूमुक्त शाळा अभियान जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र कांबळे सारिका कदम रामचंद्र टोणे ज्योती राजमाने आदीसह मान्यवर उपस्थित होते