औंध येथे धम्म दिक्षा समारंभ संपन्न

0

सातारा/अनिल वीर : ६ डिसेंबर १९५६ नंतर ‘मी भारत बौद्धमय करीन.’ हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे अनुयायी दादासाहेब गायकवाड,बी.सी. कांबळे, आर.डी.भंडारे, भैय्यासाहेब आंबेडकर, पी.झेड. खोब्रागडे आदींच्या माध्यमातून देशभर खेडोपाडी धम्मदीक्षा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून २० मे १९५७ रोजी खटाव तालुक्यातील औंध येथे भदंत आनंद कौशल्यायन आणि आर.डी.भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्य समाज बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा देण्यात आली होती. या घटनेला ६६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर औंध येथे  सामुदायिक वंदना व  धम्मदिक्षा समारंभ संपन्न झाला.१९५७ च्या दिक्षा समारंभाचे प्रत्यक्षदर्शी असणारे गणपत बाबू रणदिवे, मारुती रणदिवे,पोपट रणदिवे, शिवाजी रणदिवे, विठाबाई शाहू खरात आदिंचा सत्कार करण्यात आला.यातील शिवाजी रणदिवे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस अविनाश बारसिंग यांनी समाजाचा इतिहास व सध्यस्थिती यावर भाष्य केले. याप्रसंगी प्रकाश कांबळे, भगवान रणदिवे, सुधाकर शिलवंत, सत्वशीला रणदिवे, मीना रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले.कैलास रणदिवे यांनी सर्व उपस्थितांना पुस्तकांचे वाटप केले.सविता शिरसाट यांनी, ‘मी रमाई बोलते’ ही एकांकिका सादर केली.यावेळी उपासक-उपासीका, बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खटाव तालुका सरचिटणीस अरुण रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णत केंजले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here