केंद्रीय अभ्यासक्रमात बाबासाहेबांचा उल्लेखच नाही !

0

सातारा/अनिल वीर : आयसीएसईच्या दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा साधा उल्लेखही नाही.

              पुस्तकाचे नाव ” Total History & Civics ” असे आहे . मॉर्निंग स्टार पब्लिकेशन नवी दिल्ली यांनी हे पुस्तक पब्लिश केलेले आहे . वाराणशीच्या डॉली एलन नावाच्या बाईने हे पुस्तक लिहिलेले असून बंगळूरच्या एस . इरुदया राज यांनी हे पुस्तक संपादित केले आहे.भारतीय इतिहासात बाबासाहेबांचे योगदान काय आहे ? हे सर्व देशाला माहित असले तरी सरकारला ही माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक वाटू नये. ही संतापजनक बाब आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात काल परवाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचेही फोटो आहेत . पुस्तकात गांधी, नेहरू यांच्यासह देश – विदेशातील सगळे विद्वान आहेत .पण बाबासाहेबांचा फोटो सोडा.देशाच्या या संपूर्ण इतिहास नावाच्या पुस्तकात घटनाकार बाबासाहेबांचा साधा नामोल्लेखही नाही.सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे.तेव्हा पुस्तक मागे घेवून सुधारित निर्मिती करावी.अन्यथा,देशभर जाब विचारण्याचे काम सुरू झाले की,सरकारला पळता भुई होईल…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here