समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेधासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव येथे समाजकंटकांनी माता रमाई जयंतीनिमित्त लावलेला शुभेच्छा फलक फाडलेला आहे. तसेच अभिनेता राहुल सोलापूर यांनी आता छ. शिवराय तर पूर्वी डॉ.आंबेडकर यांच्याबद्धल अपशब्द बोलल्यामुळे जाहीर निषेध करण्यात आला.अशोक भोसले यांच्या मातोश्री रखमाबाई भोसले यांच्या निधनाबद्धल आदरांजलीपर ठराव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर यांनी मांडला.सर्व उपस्थितांनी अनुमोदन दिले.
बुधवार दि.१२ रोजी माघ पौर्णिमेनिमित्त सायंकाळी ६।। वा.मिलिंद सोसायटीच्या सांस्कृतिक सभागृहात प्रियांका मॅडम यांचे त्यागमूर्ती रमाईच्या जीवनचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई डावरे भूषवणार आहेत.अशी माहिती समितीचे अध्यक्ष शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी दिली. पुतळा परिसरात वंदनेसह धार्मिक व सामाजिक कार्यक्रम नियमित होत असतात.तेव्हा इच्छुकांनी वेळेवर उपस्थीत राहून सहभाग नोंदवावा.असेही आवाहन संयोकांनी केले.
प्रथमतः डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून चंद्रशेखर जीवने,श्यामराव बनसोडे,वसंत गंगावणे व प्रियांका ताकसांडे यांनी अभिवादन केले.भन्ते दिंपकर (थेरो) यांनी व सर्व उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादान केले.थेरो यांच्या मार्गदर्शनावाखाली विधी पार पाडला. सदरच्या कार्यक्रमास सीताराम गायकवाड,वामन गंगावणे,अंकुश धाइंजे,बी.एल. माने,सुखदेव घोडके,अशोक गायकवाड,अमर गायकवाड, प्रा.रमेश गायकवाड, विलास गायकवाड,गणेश कारंडे, बाळासाहेब सावंत,ऍड. हौसेराव धुमाळ, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती,पौर्णिमा मागोत्सव समिती,धम्मबांधव उत्सव कमिटी,सम्यक ज्येष्ट नागरीक संघ, भारतीय बौद्ध महासभा यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थीत होते.ऍड.विलास वहागावकर यांनी आभार मानले.