राकेश महाडिक सर यांच्या हस्ते ध्वजारोहण, विद्यार्थ्यांना 64 ट्रॅकसूट वाटप..
महाबळेश्वर:
शिरवली येथिल कोयना खोरे विद्यालयात 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बिरवाडी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्ष श्री राकेश महाडिक सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास मालुसरे, शिरवली गावचे सरपंच संतोष जंगम, ग्रामपंचायतीचे सदस्य, महिला बचत गटातील महिला, ग्रामस्थ, पालक, शिक्षण प्रेमी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले आणि तिरंग्याला सर्वांनी सलामी दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री कासुर्डे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वराजंली खाडसकर या विद्यार्थिनीने भाषण करून देशभक्तीची भावना व्यक्त केली. यावेळी राकेश महाडिक सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना 64 ट्रॅकसूट (गणवेश) वाटप केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि सर्वांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय एकतेची भावना प्रकर्षाने जाणवली.