ग्रामपंचायतीचा अनागोंदी काराभारा विरोधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू !

0

अनिल वीर सातारा : ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभारासह ग्रामपंचायतीने दिलेल्या आराखड्याप्रमाणे काम केले नाही.म्हणून  जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर आसू,ता. फलटण येथील शुभम शिवाजी पवार गेली चार दिवस झाले उपोषणास बसलेले आहेत. अद्याप सम्बधितांनी दखल घेतली नाही.

               संबंधित ठेकेदार यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या आराखड्‌याप्रमाणे काम केले नाही.तसेच ग्राम विकास अधिकारी यांना हाताशी धरून दलित वस्तीकडे जाणारे पाणी जाणीवपूर्वक दुसरीकडे वळवले आहे. त्याब‌द्दल त्यांचे विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध काय‌द्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा.सदर योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत आसू गावामधून नळ कनेक्शन देण्यासाठी रु.४,१००/- एवढे  घेत आहेत.

सदर योजनेअंतर्गत मोफत नळ कनेक्शन देण्याबाबत शासनाचा आदेश असून संबंधित ग्रमविकास अधिकारी पैसे घेत असल्यामुळे त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.सदरची योजना राबवत असताना खोदण्यात आलेल्या विहिरीतून निघालेला मुरूम संबंधित ठेकेदार यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांना हाताशी धरून त्याची विक्री केली आहे.त्याबाबत महसूल काय‌द्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा.सदरची योजना अ‌द्याप पर्यत अपूर्ण आहे. परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सदर योजना पूर्ण झाली असल्याबाबतचा ठराव दिला आहे.त्याबाबतही आयदेशीर कारवाई व्हावी.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व सम्बधितांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here