सातारा प्रतिनिधी; सातारा तालुक्यातील ग्रामसेवकांतर्फे 25 जानेवारी 2025रोजी सज्जनगड स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला. याबाबत सविस्तर सातारा तालुक्यातील शेकडो ग्रामसेवकांतर्फे सज्जनगड साफसफाई अभियान राबविले जाते. हे अभियान दर तीन महिन्यांनी सज्जनगड राबविले जाते. शंभर दिवस कार्यालयासाठी हा उपक्रम मुख्यमंत्र्यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यातच ग्रामविकास मंत्री हे सातारा जिल्ह्याचे आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजाचे नवनवीन प्रयोग करण्यात येत आहे.
यालाच अनुसरून राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत सातारा तालुक्यातील ग्रामसेवकांतर्फे आज सज्जनगड स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशनी नागराजन आणि सातारा तालुक्याचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला. अक्षरशा साफसफाई मोहिमेमध्ये काम करताना नागराजन यांनी भाविकांनी केलेल्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच बुद्धी यांनी स्थानिक प्रशासन यंत्रणेला सज्जनगड परिसरात भाविकांनी अस्वच्छता पसरवू नये यासाठी ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना सूचना सुद्धा दिल्या आहेत. सोबतच ग्रामसेवकांनी राबवलेल्या उपक्रमाबाबत कौतुकही केले आहे.
बेशिस्त भाविकांनी आपल्या आचरणात बदल करावा असा मोलाचा सल्ला उपस्थितांना दिला आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि गटविकास अधिकारी सातारा निकम ग्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती सातारा, केवटे विस्ताराधिकारी कृषी, अमित गायकवाड बी.आर. सी.सरपंच यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.