सातारा/अनिल वीर : राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात येथील रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयमध्ये साजरी करण्यात आली.
राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, “राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक ठिकाणी दलित,बहुजन व वंचितांची मुले शिकावी म्हणून शाळा व वसतिगृह यांची निर्मिती केली होती.व्यवसाय व शिक्षणाच्या माध्यमातून सवर्ण व दलित – वंचितमधील दरी महाराजांनी संपुष्टात आणली.” यावेळी जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मदन बापू खक्काळ व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दामिनी निंबाळकर यांनी प्रतिमेचे पूजन केले.नितीन बोतालजी, रामभाऊ मदाळे, सोमनाथ धोत्रे व संतोष नलवडे यांनी मनोगत व्यक्त केली. सदरच्या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्षा सुनीता जगताप,कोरेगाव तालुकाध्यक्षा मनीषा सोनवणे, मनीषा खरात खवळेताई,सागर गव्हाळे, अतुल गरड, शाहिद कुरेशी, शौकत कुरेशी, मोसिम बागवान आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.