सातारा/अनिल वीर : रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर,ता.जावळी येथे सातारा जिल्हा शिक्षण विभाग, पंचायत समिती जावली व मेरू विद्यामंदिर वाघेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने जावली तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
प्राथमिक गट ७३, माध्यमिक गट २६, पाथमिक शिक्षक गट २ व माध्यमिक शिक्षक गट ४ अशी उपकरणे सहभागी झाली. पदर्शनाचा समारोपप्रसंगी संजय धुमाळ (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जावली) यांनी पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पूष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.यावेळी परिवेक्षित गटशिक्षणाधिकारी सौ. वाकडे मॅडम व विस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे,सर्व केंद्रप्रमुख, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व सरपंच, पंचकोशीतील ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कार्मचारी यांचा सत्कार शिक्षण विभाग पंचायत समिती यांनी केला. विज्ञान प्रदर्शनातील उपकरणांचे परिक्षण सौ.विभा सावळे, सौ. स्वाती नष्टे व अविनाश साळुंखे यांनी केले . पुढिलप्रमाणे स्पर्धाचे निकाल जाहीर झाले आहेत.
उपकरण निर्मातीत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक- स्वराज तरडे (जि.प. शाळा कुडाळ), दवितीय क्रमांक-निखील सावळे (श्री. विठ्ठलराव देशमुख माध्य. विद्यालय गांजे) व तृतीय क्रमांक- कु. उत्कर्षा विरामणे (जि.प. शाळा वेलोशी). माध्यमिक गटात प्रथम क्रमांक- पारस मोरे (जनता माध्य. विद्यालय करंदी), दवितीय क्रमांक-अथर्व पवार (महायोगी गगनगिरी माध्य विद्यालय कापसेवाडी) व तृतीय क्रमांक- आदर्श खानदेशी मेरू विद्यामंदिर वाघेश्वर.प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्र.सौ. सुवर्णा साळवी (जि.प.शाळा शिवाजीवाडी तेटली) व दवितीय क्र.समृदधी जाधव (जि. प. शाळा आनेवाडी). माधमिक शिक्षक गटात प्रथम क्र. प्रिया वाघंवरे, द्वितीय क्र. सौ. माधुरी घाडगे (मेरू विद्यामंदिर वाघेश्वर), निबंध स्पर्धा प्राथमिक गट प्रथम क्र. कु. अनुष्का कांबळे (जि.प.शाळा मेढा) व माध्यमिक गटात प्रथम क्र. कु.प्राची सपकाळ (म्हाते विद्यालय). प्रश्नमंजूषा स्पर्धा प्राथमिक गट प्रथम क्र. आर्यन वारागडे, कु उत्कर्षा कोळी व कु.आर्या माळेकर (कुडाळ) यांनी यश संपादन केले आहे.