सातारा : येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता लायसनधारक विक्री करत नसलेबाबत. शिवाय, अमित शेटे यानी केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिलिंद कांबळे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण दोन दिवस झाले तरी संबंधित भेटायलाच न आल्याने सुरूच ठेवण्यात येणार आहे. समाजसेवक मिलिंद वामन कांबळे (रा.सैदापुर, पो.कोंडवे,ता.सातारा यांनी
दि. ८ जानेवारी २०२५ रोजी सहजिल्हा निबंधक वर्ग १ मुद्रांक जिल्हाधिकारी (संजय पाटील) व तहसिलदार यांना स्टॅम्प विक्रीधारक विक्री करत नसल्याबाबत निदर्शनास आणून दिले होते.त्यानी चौकशीअंती आठ जनांची निलंबनाची ऑर्डर काढली होती.तसेच दुय्यम निबंधक (वर्ग-२) सातारा क्रमांक १ च्या अहवालानंतर नियमानुसार उचीत कार्यवाही करण्यात येणार आहे.असे सांगण्यात आले होते. तसे लेखीही आहे. त्यामुळे आठ दिवसाकरीता उपोषण स्थगीत केली होते.
आठ दिवस होवून गेले तरी त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. मुद्रांक विक्रेता यांचे निलंबन झाले असुन ही पिटीशन रायटर हे जुन्या अभिलेख कक्षामध्ये अजुनही बसले आहेत.त्यांना बसण्यास मज्जाव करावा.अमीत शेटे यानी केलेले अतीक्रमण हटवावे.यावेळी मिलिंद कांबळेसह बसपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप जगताप,वंचितचे सचिव योगेश कांबळे, सुधाकर काकडे, श्रीरंग काकडे,संगीता शिंदे,श्वेता भगत, रेश्मा बागवान,शुभांगी निकम, रमेश गायकवाड,विकास बैले,गणेश जगताप,सुभाष (पशा) घाडगे,विशाल मोरे, के.एस.कांबळे,शंकर गंगावणे, ऍड.विलास वहागावकर,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थीत होते.