सातारा/अनिल वीर : जिल्हा भारतीय बौद्ध महासभा (जिल्हा पश्चिम अंतर्गत) ची जिल्हा कार्यकारणीची निवड राष्ट्रीय सचिव बी.एच.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि ॲड.डॉ. एस.एस.वानखडे (राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली होती.तीच अधिकृत असून जिल्हाध्यक्ष म्हणून अशोक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तरोत्तर कामकाज चांगले चाललेले आहे.असा दस्तुरखुद्द खुलासा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.ऍड.भीमराव आंबेडकर यांनी केला आहे.
महाविहार,कराड या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यातील झालेल्या घडामोडी संदर्भात राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर आणि राज्याध्यक्ष भिकाजी कांबळे यांच्याकडे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी मांडलेल्या सूचनानुसार चर्चा विनिमय करण्यात आला.तेव्हा वरील घोषणा करण्यात आली.
डॉ.भीमराव आंबेडकर यांनी पलूस येथील कार्यक्रम संपवून महाविहारास भेट दिली.तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ.हरीष रावलिया ( ट्रस्टी चेअरमन) यांच्या नावाखाली जिल्ह्यामध्ये अधिकृत केलेली कार्यकारणी असा अपप्रचार करीत आहेत. याबाबत ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिष रावलिया यांच्याकडे संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, “मी कोणत्याही नवीन कार्यकारिणीस मान्यता दिलेली नाही. मला धार्मिक कार्यक्रमाचे निमित्ताने मला जिल्ह्यात बोलवण्यात आले होते.” असा खुलासा केल्याचेही चर्चा करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावानुसार ट्रस्टी चेअरमन डॉ.हरिष रावलिया, ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲड.सुभाष जौंजाळे तसेच सर्व ट्रस्टी सदस्य यांनी संस्थेच्या कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीत
राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भिमराव आंबेडकर यांना अधिकार दिलेले असून त्यांच्या आदेशानुसारच देशभरात संस्थेचे कामकाज सुरू आहे.तेव्हा जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या इतर झालेल्या निवडी अनाधिकृत आहेत. त्यास कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नाही.सातारा जिल्हा पश्चिम यांची संस्थेच्या नियमाप्रमाणे कायदेशीररीत्या जिल्हाध्यक्ष पदावर अशोक भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांच्या आदेशानुसार जिल्हांतर्गत तालुका कार्यकारिणी,पदाधिकारी निवडीबाबत कायदेशीर मान्यता असलेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.एस.के भंडारे यांनी जाहीर केले आहे.त्याप्रमाणे यापुढे संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी कामकाज करावे. अशाप्रकारच्या सुचना आणि मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे, जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, कोषाध्यक्ष सचिन आढाव, माजी सरचिटणीस सुनिल सकपाळ, विद्याधर गायकवाड,भिमराव गायकवाड,तालुकाध्यक्ष बी.एस. माने (कराड),आनंदा गुजर (पाटण) व मोहनराव खरात (जावळी),भिमराव परिहार आदी जिल्ह्यातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.