सातारा : बांबवडे,ता.पाटण येथील कु.आम्रपाली बाबासो भंडारे बांबावडे हिने जिल्हा वेटलिफ्टिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून सुयश संपादन केले.
कु.आकांक्षा ही लोकनेते बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये शिकत आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४-२०२५ च्या संपन्न झाल्या होत्या.त्यात वेटलिफ्टिंग खेळामध्ये तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या हस्ते प्राविण्य प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान केला आहे.याबद्धल अनेक मान्यवरांसह शिक्षण व क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.