जिल्ह्यात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार : किरण बगाडे

0

अनिल वीर सातारा : वंचित,शोषित,पीडित व अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार आहे.असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी केले. येथील सर्किट हाऊस येथे पक्षाची सहविचार सभा होऊन असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.अशीही माहिती बगाडे यांनी दिली.

           

   किरण बगाडे म्हणाले,  “महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक तथा पक्ष प्रमुख संजय (भैय्या) सोनवणे हे महाराष्ट्र मधील स्वाभिमानी नेतृत्व आहे.  आयु.सोनावणे यांच्या आदेशाने पक्षाचे काम महाराष्ट्रमध्ये  जोरदार सुरू आहे.आजपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचा वापर करण्यात  नेत्यांना यश आले आहे.कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे.घडला पाहिजे. याच उद्देशाने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची वाटचाल महाराष्ट्रात सुरू आहे.त्याच अनुषंगाने जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी काम करणार आहे.”

   जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्किट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्ह्यातील पक्ष विस्तार करण्यासाठी प्रत्येक गावागावात कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पक्ष बांधणी सर्व पदाधिकारी यांना विचारात घेऊन तरुण चेहऱ्यांना संधी देणारं असल्याचेही सर्वानुमते ठरविण्यात आले.

             

सोमनाथ धोत्रे म्हणाले,  “विविध पक्षात कार्यकर्ते नाराज आहेत.यापुढे कार्यकर्त्यासाठच काम करणार आहे.” ऍड. नलावडे म्हणाले,” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हक्काने अधिकार दिलेले आहेत.त्याचा वापर केला जाशील.”  महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये काम करण्याचे सूतोवाच अनिल उमापे यांनी केले व आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास संतोष भिसे, मंगेश गायकवाड प्रणित मोरे, सयाजी भिसे,विजय सातपुते,श्रीकांत शिंदे,किरण जाधव,सुनील कदम, रणवीर परदेशी,सूरज भिसे,अरविंद घाडगे,शौकत कुरेशी, अजय अवताडे, राकेश खरात, योगेश माने (पैलवान) व इतर असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here