सातारा/अनिल वीर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, ता.महाबळेश्वर येथील विद्यार्थी सोहम विष्णू ढेबे हा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १० वा आला आहे. तर आर्यन ढेबे हा पात्र ठरला आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धेत ६०० मीटर धावणे प्रकारात देवयानी हरिबा चव्हाण व लांब उडी स्पर्धेत नंदिनी प्रदिप जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ८०० मीटर धावणे प्रकारात अनुष्का किसन जाधव व योगासन स्पर्धेत शुभंकर विष्णू ढेबे याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.कुस्ती स्पर्धेत विघ्नेश किरण चव्हाण याने कांस्य पदकाची कमाई केली.
यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धतील वक्तृत्व स्पर्धेत सोहम ढेबे याने प्रथम तर मित विजय जाधव याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठा गट तालुकास्तर प्रथम क्रमांक तर लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला. हस्तलिखित स्पर्धेत द्वितीय तर रस्सीखेच मध्ये मुले व मुली या दोन्ही गटात यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल गटविकास अधिकारी अरुण मरभळ, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिबा चव्हाण,सरपंच दिपाली पवार, उपसरपंच नदीमभाई शारवान, संतोषआप्पा जाधव, संपतभाऊ जाधव,सर्व सदस्य व ग्रामस्थ मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. अध्ययानार्थीना मुख्याध्यापक विष्णू ढेबे,शिक्षक वैशाली दाभाडे व महेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.