वाई : वाई शहरात सुरू असलेल्या मेला कार्यक्रमामध्ये जॉईंट व्हील 100 फुटी पाळण्याला परवानगी दिल्याने अपघात होऊ शकतो या कारणाने रिपब्लिकन पार्टी आठवले गट, युवाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक गायकवाड यांनी 30 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत निवेदन दिले
याबाबत सविस्तर: गेल्या काही दिवसांपूर्वी घाटकोपर या ठिकाणी वादळामुळे होर्डिंग कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला होता. शेकडो जण जखमी झाले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात होर्डिंग वर कारवाईचा बडगा उगारला गेला. साताऱ्यातील शेकडो होर्डिंग वर पण कारवाई करण्यात आली आहे.पण वादळासारखी परिस्थिती असताना वादळासह मान्सून दाखल होत आहे असे असताना सुद्धा वाई तहसीलदार, वाई पोलीस निरीक्षक यांनी अपघाताबाबत शक्यता असूनही वाई शहरात मोठी रहदारी असणाऱ्या परिसरात जॉईंट व्हील या शंभर फुटी पाळण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. अनेकांचे जिव जातील, अशीच परिस्थिती आहे.
यालाच अनुसरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी 30 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी याबाबत निवेदन दिले आहे त्या निवेदनात असेही नमूद आहे की तेथे सुरू असलेला लहान मुलांसाठी असणारा कार्यक्रम त्याला विरोध नाही पण जॉईंट व्हील मुळे अपघात होऊ शकतो आणि यामुळेच वाई पोलीस निरीक्षक आणि वाई तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष, स्वप्निल भाई गायकवाड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा, यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यासह त्या ठिकाणी जाऊन जॉइंट व्हील बंद करेल असा इशाराही देण्यात आला आहे