वाठार स्टेशन : दिवसांपूर्वी ज्येष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्ती युवक संघाचे संस्थापक ह.भ.प बंडातात्या कराडकर यांना पक्षाघातामुळे पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आजपर्यंत ह.भ.प बंडातात्या कराडकर हे रुग्णालयातच असल्याने त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून सोळशी येथील त्यांच्या शिष्यगणांनी येथील शुळपानेश्र्वर मंदिरात सलग १२ तास महामृत्युंजय मंत्राचा अखंडपणे जप सुरू केला आहे याबाबत गेले कित्येक वर्ष ह.भ.प बंडातात्या कराडकर हे कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला पाहिजे म्हणून अथक परिश्रम घेत आहेत कित्येक युवक ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्यामुळे व्यसनमुक्त झाले आहेत.
तसे पाहिले तर ह.भ.प बंडातात्या कराडकर यांचे संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्ती युवक संघ या संस्थेच्या माध्यमातून युवक मित्र जोडले गेले आहेत अखंड महाराष्ट्र व्यसनमुक्त व्हावा म्हणून सतत बंडातात्या कराडकर हे झटत असतात व त्यांचे शिष्यगणही हे काम अखंडपणे चालवीत असतात काही दिवसांपूर्वी बंडातात्या कराडकर यांना पक्षघाताचा धोका जाणवल्याने त्यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले आज देखील त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू असल्याने सोळशी येथील त्यांच्या शिष्यगणांनी येथील शुळपानेश्र्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप सलग १२ सुरू केला आहे याबाबत लवकरात लवकर ह.भ.प बंडातात्या कराडकर यांची प्रकृती सुधारावी म्हणून या जपाचे पठण केले जात आहे.