सातारा/अनिल वीर : सर्व बाजुनी सुरक्षितता राहण्यासाठी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील अपूर्ण असलेले मुख्य गेटचे काम स्तुपासह पूर्ण लवकरात लवकर केले जाईल.अशी आश्वासने संबंधित वारंवार देत असल्याने उत्तरोत्तर नागरिकांमध्ये संताप निर्माण होत असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
यापूर्वी,पालिकेचे ज्युनियर इंजिनिअर आर.एम.व्ही.व इतरांनीही आश्वासने दिली असून कारवाई मात्र शून्यच.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पालिकेतील ज्युनियर इंजिनिअर व त्यांच्या टीमशी चर्चा सकारात्मक कायमच होत असून कामालाही मात्र सुरुवातही नाही.
सुशोभीकरण करण्यासाठी गेटवर स्तुपाची प्रतिकृती तयार करण्यासाठी साचेबंद काम झाले आहे.मात्र,परिपूर्ण काम झालेले नाही.तेव्हा संपूर्ण साचा करून त्याचा मोल्डिंग करावे लागणार आहे.त्यावर डीझाईन फायबरची करावी लागणार आहे.त्यासाठी अगोदर प्लास्टिक मोल्ड बनवावे लागणार आहे.या सर्व गोष्टीस टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली पाहिजे.सुमारे १४ एप्रिलपर्यंत झालेले काम पुढे ठप्प झालेले आहे.दरवाजाही नसल्याने सुरक्षितता धोक्यात आली आहे. तेव्हा अपूर्ण असणाऱ्या कामास नियमाप्रमाणे तरी सुरुवात करावी. तरच पूर्ण काम होण्यास मदत होईल.तेव्हा कोणते काम कुठुन तयार करून आणायचे ? त्याबाबत त्वरित उपाययोजना संबंधितांनी त्वरित करावी. अन्यथा,प्रवेशद्वारावरच आंदोलन छेडण्यात येणार आहे.