अनिल वीर सातारा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानचा वाद सोडविण्यासाठी अंबादास शिंदे यांना घरमालक यांचे अधिकारी पत्र दिले असल्याने काही दिवसात प्रश्न मार्गी लागणार आहे. सदर प्रकरणात घरमालक उदय आमने यांच्याशी अनेक दिवसापासून अंबादास शिंदे हे संपर्क साधून आहेत. याबाबतची माहिती व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. हा प्रश्न हायकोर्टात दाखल आहे. स्थगिती घेतली आहे. तरीही घरमालक उदय आमने यांना समजावून सांगण्यासाठी मदत करत आहेत.
यासाठी त्यांनी अंबादास शिंदे यांना सही करून अधिकार पत्र दिले आहे. त्यामुळे आता लवकरच प्रश्न सुटेल. खरोखरच,सर्वांसाठी,आनंदाची बातमी आहे.अशी माहिती अरविंद गाडे (अध्यक्ष, जिल्हा भारतीय दलित पँथर) यांनी दिली आहे.ही आपले सर्वासाठी आनंदाची बातमी आहे.
उदय आमने आपल्या पत्रात म्हणतात, “आमचे घर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणून सरकारने घोषित केले आहे.हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आहे.यावर स्थगिती आदेश दिले आहेत.यावर शासन पुढाकार घेत नाही.त्यामुळे प्रकरण प्रलंबित आहे.मी तडजोड करण्यासाठी तयार आहे.दुसरीकडे मी सुचवलेली शासकीय जागा द्यावी.माझ्या मुलास शासकीय नोकरी द्यावी. शिवाय, शासनांनी मंजूर केलेल्या रक्कमेत वाढ करावी.”