डॉ.आंबेडकर यांनी शाळा प्रारंभ साताऱ्यात केल्याने जगजेत्ते ठरले !

0

सातारा : येथील छ. प्रतापसिंह हायस्कुलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते.पुढे त्यांनी सर्वोच्च शिक्षण घेऊन समाजातील सर्व घटकासाठी केलेले कार्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर पोहचले आहे.त्यामुळेच जगजेत्ते ठरले आहेत.अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

 शाळा प्रवेश दिनानिमित्त मानवंदना,शाहु बोर्डिंग येथे शालेय वाटप आदींबाबत नियोजन करून डॉ.आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अध्यक्षस्थानी संयुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.

             यावेळी ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते विलासराव कांबळे यांनी  सद्यस्थितीवर भाष्य करून आगामी निवडणुकांत परिवर्तन करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. असे अनेक उदाहरणांसह त्यांनी विश्लेषण केले.यावेळी कालकाथीत  सदाशिव होवाळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.अनिल वीर यांनी  सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.शाहिर श्रीरंग रणदिवे,प्रकाश फरांदे व सत्यवान गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पोवाडे सादर करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमास ऍड.हौसेराव धुमाळ, माजी प्राचार्य प्रकाश रणबागले, वसंत गंगावणे,दिलीप कांबळे, सीताराम गायकवाड, बाळासाहेब जाधव,अमर गायकवाड,दयानंद बनसोडे, नवनाथ लोंढे,अंकुश धाइंजे, बाळासाहेब सावंत आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here