सातारा : शुन्यातून विश्व निर्माण करून सर्वच क्षेत्रात भरीव कार्य करीत असलेले भानुदास सावंत हे तारळे भागाचे मुकुटमनी आहेत. असे प्रतिपादन बाजीराव न्यायनीत यांनी केले.
तारळे विभागीय भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष,पाटण तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक दमदार अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे बंधुत्व समाजरत्न भानुदास सावंत यांचा अभिष्टचिंतनपर सोहळा सावरघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा न्यायनीत मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन विभागाचे ज्येष्ट मार्गदर्शक राजाराम भंडारे होते.
बौद्धाचार्य उत्तम पवार म्हणाले, “विरोधकांना सोबत घेऊन जाण्याची कला भानुदास यांना अवगत आहे.त्यांनी सुमारे २० वर्षे झाली तारळे विभागीय भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे. यापुढेही आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहू.सभ्येतेचा पुतळा मानव असूच शकत नाही. मात्र, वारंवार चुका करणे अक्षम्य बाब असते.तेव्हा धम्म विचाराने बदल होणे गरजेचे आहे.या गावात विभागात पहिली दीक्षा घेण्याचेही भाग्य भानुदास यांच्यासोबत लाभले.”असे स्पष्ट करीत पवार यांनी भानुदास या नावातील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट केला.बौद्धाचार्य विजय भंडारे म्हणाले,”पुनर्वसनाचे काम सावन्त यांनी करून न्याय दिला आहे.विभागात सामुदायिक निर्णय होत असल्याने वर्षावास व इतर सर्व कार्यक्रम सावंतसाहेब यांच्या नीटनेटक्या नियोजनाप्रमाणे होत असतात.”
बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर म्हणाले, “विभागात सावंतसाहेब यांचे कार्य सर्वच क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आहे.त्यामुळे त्यांना पदोन्नती नक्कीच मिळेल. नेहमी उत्साही व पारदर्शकपणे समाजात ते वावरत असतात. राजकीय,सामाजिक आदी क्षेत्रासह लोककलेतही ते पारंगत आहेत.महासभेचे कार्य पाहता त्यांची वर्णी तालुका-जिल्हा स्तरांवर होईल.असा भक्कम दावा त्यांचा आढळुन येत आहे.” माजी पीएसआय विजय माने म्हणाले,”भानुदास यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच आहे.ते कायमच समाजाशी एकरूप असतात.” आनंदा भंडारे म्हणाले,”लोककलेबरोबरच सावंत यांनी सर्वच क्षेत्राशी नाळ जोडली आहे.ते सर्वानुमते निर्णय घेत असतात.” मुख्याध्यापक सुनील माने म्हणाले, “सावंतसाहेबांनी समाजमन व माणुस जोडण्याचे काम सातत्याने काम करीत आहेत.” राजाराम भंडारे म्हणाले,”विभागात दीक्षाभूमी निर्माण करण्यामध्ये सिंहाचा वाटा भानुदास सावंत यांचा होता. खरोखरच,ते सत्यवादी आहेत. स्पष्टवक्तेपणा,परखडपणे व मनमोकळेपणाने बोलतात. त्यामुळे सावंत कायमच भागासाठी अधिकाधिक काम करतील.”
सत्कारास उत्तर देताना भानुदास सावंत म्हणाले, “भरभरून समाजाचे प्रेम मिळत असल्याने यापुढे दुप्पट काम करण्याची उर्मी निर्माण झाली आहे.त्यामुळे जी जबाबदारी द्याल तिचे पालन नक्कीच धीरोदात्तपणे करेन.” प्रारंभी,सर्व महापुरुष यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. भानुदास सावंत यांच्या मातोश्रींचा भव्य दिव्य असा अनोखा चौफेर सत्कार राजाराम भंडारे,अनिल वीर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.किशोर धरपडे यांनी सूत्रसंचालन केले. सरतेशेवटी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. दरम्यान, तालुक्याचे युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर व त्यांच्या सहकारी यांनी भानुदास सावंत यांची सदिच्छा भेट घेऊन अभिष्टचिंतन केले.सदरच्या कार्यक्रमास जगन्नाथ अडसुळे, शंकर भिसे (अण्णा), रामचंद्र जाधव,अशोक कांबळे, सचिन सोनवणे,चंद्रकांत कांबळे, दिव्यांग कांबळे, दिनकर सपकाळ,दत्ता सावंत,साहिल जगदाळे,गणपत सप्रे,राजू सावंत, आनंदराव भंडारे,बाबासाहेब कांबळे, मनोज भंडारे,धनाजी कांबळे, राजु सप्रे,आनंद टेलर, साहेबराव माने,फौजी बापू,तुषार अडसुळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते,उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.