कऱ्हाड – दोन जिल्ह्याच्या हद्दीवर टोल नाका असावा असा निकष आहे, परंतु कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील तासवडे येथील टोलनाका ना जिल्हा ना तालुक्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत. संबंधित स्थानिकांना टोल नाक्यावर सलवत द्यावी अशी मागणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत केली.
तासवडे येथे औद्योगिक वसाहत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते, टोल नाक्याच्या जवळपास अनेक छोटी मोठी गावे आहेत, स्थानिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो, दोन जिल्ह्याच्या हद्दीवर टोल नाका असावा असा निकष आहे, परंतू तासवडे टोल नाका या निकषात बसत नाही.कामानिमित्त लोक तालुक्याच्या ठिकाणी जात असतात त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो, स्थानिकांना याठिकाणी सवलत मिळावी देणार का असा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानभवनात उपस्थित केला.