सातारा/अनिल वीर : अत्याचार करून मर्डर करणाऱ्या संबंधित सर्व सहकाऱ्यांना फासावर लटकवा. महिला व विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील रूममध्ये अलार्म बेल बसवण्यात याव्यात. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकोला येथून मुंबई येथे कॅम्पुटर इंजिनिअरिंग शिकण्यासाठी आलेली कु.हिना कांबळे या तरुणीवरती वस्तीगृहातील कर्मचाऱ्याने अमानुषरित्या बलात्कार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. तेव्हा सर्व संबंधितांना फासावर लटकवण्यात यावे.तसेच संबंधित वसतिगृहाचे अध्यक्ष व केअरटेकर यांना निलंबित करण्यात यावे. तसेच तमाम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक महिला व विद्यार्थिनी-विध्यार्थी वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये अलार्म लावण्यात यावेत. संबंधित कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. शिवाय, घरातील कुटुंबीयातील एका माणसाला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे.सदरची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महिलांना सुरक्षितता देण्यासाठी वेळप्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.असाही गर्भित इशारा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.