सातारा दि. 21 : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त ‘देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा शक्तीनिशी मुकाबला करण्याची, सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकवून मानवी मूल्यांना धोका पोहचविणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु,’ अशी शपथ दिली. यावेळी नायब तहसीलदार अनिल जाधव, आपत्ती व्यवस्थापक देविदास तामाने, संतोष झनकर, क्षीरसागर व इतर कर्मचारी उपस्थित होते.