सातारा/अनिल वीर: लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही… या उक्तीचा प्रत्यय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्यावतीने पुरस्कार वितरण करण्यात आल्याची आठवण आली.कारण,ते सर्व पक्षाचेच पदाधिकारी व प्रदान करणारेही पक्षाचेच पदाधिकारी होते.निमित्त होते पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या वाढदिवसाचे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे जिल्हाध्यक्षा दामिनी निंबाळकर यांना रिपब्लिकन संघर्ष योद्धा पुरस्कार सचिव संजना पोतदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थीत होत्या.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या उपाध्यक्षा स्मिता जगताप यांना महामाता रमाई पुरस्कार तर नितीन बोतालजी यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)चे राज्य संघटक कैलास जोगदंड व दादासाहेब ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान सोहळा पार पाडण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्धल जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या सर्व आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.